नगरसह राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती आणि शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत सत्कार समारंभाला फाटा देत साध्या पध्दतीने सभेचे कामकाज चालवण्यात आले. सभेपूर्वीच संचालक मंडळाच्या तातडीच्या बैठकीत जिल्हा बँकेने अतिवृष्टी बाधितांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता फंडात 1 कोटी 11 लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सभेत चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. यावेळी बँकेच्या नवीन क्यूआर कोड सेवेचा शुभारंभ उपस्थितीत पाहुणे आणि संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा सहकारी बँकेच्या 68 वी वार्षिक सर्वसाधारण गुरूवारी दुपारी 1 वाजता नगरच्या सहकार सभागृहात बँकेचे चेअरमन कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पालकमंत्री विखे पाटील, विधानसभेचे सभापती राम शिंदे, व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे, संचालक आ. मोनिका राजळे, अण्णासाहेब म्हस्के, विवेक कोल्हे, अरूण तनपुरे, चंद्रशेखर घुले, सीताराम पाटील गायकर, बाजीराव खेमनर, भानुदास मुरकुटे, करण ससाणे, अनुराधा नागवडे, गितांजली शेळके, प्रशांत गायकवाड, अमोल गायकर, अंबादास पिसाळ, गणपतराव सांगळे, आशा तापकीर, माजी खा. सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


