ऍण्टीकरप्शन ब्युरो ऑफ इंडिया (भ्रष्टाचारविरोधी) संस्थेच्या अहिल्यानगरच्या शहर अध्यक्षपदी बाळासाहेब नागूल यांची निवड
अहिल्यानगर ः शिर्डी येथील साईछत्र हॉटेलमध्ये ऍण्टीकरप्शन ब्युरो ऑफ इंडियाच्या राज्यातील पदाधिकार्यांसाठी पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी ऍण्टीकरप्शन ब्युरो ऑफ इंडिया(भ्रष्टाचारविरोधी) या संस्थेच्या अहिल्यानगरच्या शहर अध्यक्षपदी बाळासाहेब नागूल यांची निवड करण्यात आली. ऍण्टीकरप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे देशाचे अध्यक्ष श्री.राजेश जिंदाल यांच्या उपस्थितीत अध्यक्षपद निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. या पदासाठी ऍण्टीकरप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे ऍड. नारायण राऊत यांनी नाव सूचविले.
यावेळी ऍण्टीकरप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे देशाचे अध्यक्ष श्री.राजेश जिंदाल, ऍण्टीकरप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे देशाचे उपाध्यक्ष श्री.दिलीप सोनवणे(नाना), ऍण्टीकरप्शन ब्युरो ऑफ इंडिया महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री.मनिष खुराणा, महाराष्ट्र राज्याचे संचालक श्री. प्रमोद शितोळे(पत्रकार), ऍण्टीकरप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे महिला अध्यक्षा उमा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम खेळीमेळीत आणि उत्साहात झाला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री साईबाबांच्या प्रतिमेला वंदन करून पुष्पहार व फुले वाहून करण्यात आली. यावेळी राज्यातील अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सातारा, पुणे, बीड येथील आदी विविध ठिकाणचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी ऍण्टीकरप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे देशाचे अध्यक्ष श्री. राजेश जिंदाल यांनी विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. तसेच श्री.दिलीप सोनवणे(नाना), श्री. मनिष खुराणा, पत्रकार प्रमोद शिताळे, उमा कांबळे मॅडम यांची भ्रष्टाचार विरोधाच्या विविध विषयांवर यांचेही भाषणे झाली. यावेळी सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्याचे संचालक श्री. प्रमोद शितोळे(पत्रकार), महाराष्ट्र राज्याचे उमा कांबळे मॅडम यांनी केले.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन ऍण्टीकरप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे देशाचे उपाध्यक्ष श्री.दिलीप सोनवणे (नाना) यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार ऍण्टीकरप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे देशाचे उपाध्यक्ष मा.श्री.दिलीप सोनवणे (नाना) यांनी मानले. या कार्यक्रमासाठी ऍण्टीकरप्शनच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.


