दिवाळी बोनसनंतर बालवाडी शिक्षिकांसाठी आणखी एक खूशखबर आलीय. मुंबई महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांच्या सेवासमाप्तीच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात आलीय. पूर्व प्राथमिक वर्गावरील संस्थांमार्फत मानधनावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षिकांची सेवासमाप्ती वयोमर्यादा आता ६० वर्ष असणार आहे. मुंबई महापालिकेने या प्रस्तावाला मंजुरी दिलीय.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून १ हजार १३९ बालवाड्या चालवल्या जात आहेत. यात सुमारे ३५ ते ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान महापालिकेकडून बालवाडी आणि प्राथमिक वर्गावर ना नफा, ना तोटा तत्त्वावर सेवाभावी संस्थामार्फत शिक्षिका व मदतनीसांची नियुक्ती मानधनावर करण्यात आलीय. संबंधित संस्थांना महापालिकेकडून मानधन अदा केले जाते. नंतर संस्थांमार्फत शिक्षिका आणि मदतनीसांना दिले जातं.
आधी शिक्षिका आणि मदतनीसांच्या सेवासमाप्तीचे वय ५८ वर्ष होतं. परंतु शासन निर्णयानुसार, १ नोव्हेंबर २०१८पासून नव्याने नियुक्त केलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवासमाप्ती वय ६० वर्षे राहील. तसेच मदतनीस महिलेला अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर त्या सेविकांचे सेवासमाप्तीचे वय ६० वर्षेच असेन.
 २ हजार रुपयांचा बोनस जाहीर
सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळी बोनस जाहीर केला आहे. सरकारकडून यंदाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळी भाऊबीज भेट दिली जाणार आहे. यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा दिवाळी गोड होणार. अंगणावाडी सेविका आणि मदतनीसांना २ हजार रुपायांचा बोनस दिला जाणार आहे. राज्यातील तब्बल १ लाख १० हजारांहून जास्त अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार आहेत.


