महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलला सगळेच ओळखतात. आज तिच्या कार्यक्रांना हजारोंंची गर्दी असते. तरुण, महिला अशा सर्वच वर्गात तिचा मोठा चाहता वर्ग आहे. दरम्या गौतमीच्या वाहनाचा आणि रिक्षाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात रिक्षाचे नुकसान झाले असून रिक्षाचालक जखमी झाला आहे. गौतमी पाटीलच्या वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात आज (30 सप्टेंबर) पहाटे पाच वाजता हा अपघात घडला आहे. गौतमी पाटीलच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून याबाबतची चौकशी केली जात आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी (सप्टेंबर) सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गौतमी पाटीलच्या वाहनाची पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला. हा अपघात एका हॉटेल समोर झाला. हॉटेलच्या समोर एक रिक्षा उभा होता. याच रिक्षाला गौतमी पाटीलच्या वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आणि रिक्षाचालकासब दोन प्रवासी जखमी झाले.हा अपघात झाल्याचे लक्षात येताच अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मीतेने तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर उपचार चालू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अपघात घडला तेव्हा गौतमी पाटील कारमध्ये नव्हती. तशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.


