राजकारणाचा परिणाम विकासकामांवर होऊ देणार नाही – सुजित झावरे पाटील.
निघोज येथील लामखडे वस्ती येथे श्री हनुमान मंदिरसमोर सभामंडप बांधणे सदर कामांचे उदघाटन समारंभ सुजित झावरे पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.
सुजित झावरे पाटील यांचे विशेष प्रयत्नातुन डॉ. सुजय विखे पाटील यांचे माध्यमातुन सन २०२४-२५च्या आर्थिक योजने अंतर्गत सदर काम मंजुर करण्यात आलेले आहे.
काही महिन्यापुर्वी सुजित झावरे पाटील यांचेकडे वरखडे वस्ती व परिसरातील ग्रामस्थांनी सदर सभामंडपासाठी विनंती केली होती. अवघ्या दोन महिन्यात आपला शब्द पुर्ण करुन आज दिल्याबद्दल निघोज ग्रामस्थांच्या वतीने सुजित झावरे पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने आज कार्यक्रमाचे उदघाटन करुन प्रत्यक्ष कामांला सुरुवात करण्यात आली.
यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की, माझ्याकडे कोणतेही पद नाही परंतु श्री.मळगंगा देवीच्या कृपेने मला निघोज मध्ये विकास कामे मंजूर करण्यात आली. यापुढे ही निघोज गावातील विकासकामांना निधीची कमतरता भासू देणार नाही. निघोज करांनी कायम आमच्या कुटुंबियांना साथ दिली आहे. हे मी कधीही विसरणार नाही. तालुक्यातील राजकारणाचा परिणाम विकासकामांवर कधीही होऊ देणार नाही. अजून त्रास द्या जनता माझ्या पाठीशी कायम आहे. मी तालुक्यातील जनतेच्या विकासकामे कायम करत राहणार.
यावेळी सदर कार्यक्रमासाठी बाळासाहेब लामखडे, खंडुजी भुंकन, सचिन वराळ पाटील, पंकज कारखिले, पोपट लामखडे, मिराताई वरखडे, कचरु महाराज वरखडे, उत्तम लामखडे, सुभाष वरखडे, तेजस लामखडे, अक्षय वरखडे, सुशांन वरखडे, बाळासाहेब वरखडे, गंगाधर वरखडे, चेअरमन देवराम लामखडे, मच्छिंद्रशेठ लंके, हरुनभाई तांबोळी, बबुशा आण्णा वरखडे, रामदास रसाळ, भाऊसाहेब लामखडे, उमेश सोनवणे, सोमनाथ वरखडे, राजु ढवळे, राजेंद्र लेंडे, रमजान पठाण, गौरव पवार, अनिल सुपेकर, राजु गजरे, गजानन ठुबे, ईश्वर गजरे, संतोष वराळ, अर्जुन लामखडे, गंगा वरखडे, लहु लंके, रवि रणसिंग, पत्रकार, योगेश खाडे, शाकीर व्यापारी, राजु गुंजाळ, जय हरेल, मारुती पांढरकर, निलेश व्यावळ, निलेश जंगम, भगवान मामा लामखडे, सुलतान सययद, इम्तियाज मोमीन, हिरामण कवाद, शशिकांत साळवे, मोहन आल्हाड, दत्तात्रय गुंड, पत्रकार दत्ता उनवणे, सादिक तांबोळी, ऋषिकेश घोगरे, कृष्णा लोळगे, महेश ढवळे, महेश उनवणे मान्यवर मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री.अजितदादा पवार पारनेर तालुक्यात मेळाव्यासाठी येणार आहेत. याचे निमंत्रण सुद्धा नाही याचे दुःख वाटत आहे.


