Wednesday, October 29, 2025

गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणी,मंत्री चंद्रकांतदादा पाटील आक्रमक…

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनाने 30 सप्टेंबर रोजी एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ मागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचालक मरगळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघात प्रकरणातील जखमीच्या कुटुंबीयांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन न्याय मागितला. मरगळे कुटुंबियांनी चंद्रकांत पाटील यांच्या जनता दरबारात न्याय मागत मदतीची मागणी केली. चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ फोन फिरवला अन् गौतम पाटीलला उचलायचं की नाही? असा थेट सवाल केला. पाटील यांनी डीसीपी संभाजी पाटील यांना संपर्क साधून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी गौतमी पाटील हिला चौकशीसाठी हजर राहण्याच्या तात्काळ नोटीस पाठवली आहे.

अपघात प्रकरणात नृत्यांगना गौतमी पाटील हिला पुणे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. गौतमी पाटीलला अटक करा, अशी मागणी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केलीय. मंगळवारी पहाटे पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात एका भरधाव वाहनाने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर कारचालकही फरार झाला होता…मात्र सीसीटीव्हीच्या आधारे चालकाला अटक केलीय. कार गौतमी पाटीलच्या नावाने असल्यामुळे सिंहगड रोड पोलिसांनी तिला नोटीस पाठवली आहे. या अपघात प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस गौतमी पाटील हिला पाठवण्यात आली आहे.वडगावमध्ये झालेल्या अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी कसून तपास सुरू केली आहे. त्यांनी चालकाला अटक केली असून चौकशी सुरू आहे. गौतपी पाटील हिलाही चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणात पुणे पोलीस तपासाची चक्र फिरवली आहेत. पोलीस या प्रकरणात एक विशेष अधिकारी नेमणार असल्याचे समजतेय. अपघात झाल्यावर क्रेन कोणी बोलावली ? कोणी फ़ोन केला त्याचा तपास केला जाणार आहे. गाडी कुठून आली होती तयाचाही तपास होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles