शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. मनोज लांडगे याने गाडी अडवून हल्ला केल्याचा महेश चिवटे यांचा आरोप आहे. मनोज लांडगे हा शिवसेना शिंदे गटाचे नेते दिग्विजय बागल यांचा कार्यकर्ता आहे, असं महेश चिवटे यांनी सांगितलं. महेश चिवटे यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलय.मनोज लांडगे हा भाजपच्या रश्मी बागल व त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप आहे . हल्ला झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने हे घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत. करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे सकाळी शेतात गेल्यावर महेश चिवटे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती. महेश चिवटे हे मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत.
सुपारी घेऊन माझ्यावर हल्ला
“आज माझ्या सकाळी मी माझ्या शेतातून येत असताना मताई कारखान्याचे सर्वेसर्वा रश्मी बागल व दिग्विजय बागल यांची सुपारी घेऊन मनोज लांडगे या तरुणाने माझी गाडी अडवली. त्याने मला लाठा, काठ्याने खाली पाडून बेदम मारहाण केली. मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मी पोलीस स्टेशनला फोन केला आहे. मी एवढच सांगेन यापुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल. तुलाही भाऊ आहे हे लक्षात ठेव असा इशारा महेश चिवटे यांनी दिला आहे.


