Thursday, October 30, 2025

पुण्यात आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण

पुणे : पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोहगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान आमदार पठारे यांना मारहाण करण्यात आली.

शनिवारी रात्री उशीरा हा प्रकार घडल्याचे समोर आले. या प्रकरणानंतर वडगावशेरी मतदारसंघात खळबळ उडाली आहे. आमदार पठारे हे पुण्यातील महाविकास आघाडीचे एकमेव आमदार आहेत. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या तिकीटावर ते विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरे यांचा पठारे यांनी पराभव केला.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून आमदार बापूसाहेब पठारे हे दुसऱ्यांदा निवडून आले आहे. यापूर्वी देखील पठारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. आमदार पठारे हे शनिवारी संध्याकाळी लोहगाव परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( अजित पवार) गटामधील काही कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. वादाचे रूपांतर काही वेळातच जोरदार हाणामारीत झाले. आमदार पठारे यांना काही लोकांनी मारहाण केली.

या मारहाणीच्या घटनेत आमदार पठारे यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यक्रमस्थळी अचानकपणे झालेल्या या मारहाणीच्या प्रकारामुळे येथे जोरदार गोंधळ उडाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना तातडीने यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. विद्यमान आमदारांना झालेल्या या मारहाणीमुळे येथे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

या मारहाणीच्या प्रकारानंतर पोलिसांनी येथील परिस्थिती नियंत्रणात आणली असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मारहाणीच्या घटनेमुळे स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पठारे यांना मारहाण झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. समाज माध्यमांवरून त्याची माहिती सर्वत्र पसरल्याने आमदार पठारे यांच्या समर्थकांची गर्दी या परिसरात झाली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles