नगर प्रतिनिधी लाठीचार्ज प्रकरणात अटक झालेल्या नौजवानांना अखेर दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जाला मंजुरी दिली असून, आदेशाची प्रत (लखोटा) संध्याकाळपर्यंत तयार होण्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर हा आदेश नाशिक येथील कारागृहात टपालद्वारे पाठविण्यात येणार असून, उद्यापर्यंत सर्व तरुणांची सुटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणात अनेक वकिलांनी एकत्र येऊन अटक झालेल्या तरुणांची बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडली. यामध्ये अॅड. शेख हाफिज एन. जहागीरदार, अॅड. अख्तर सय्यद, अॅड. शेख फारुख बी., अॅड. रफिक बेग, अॅड. एस. आर. सय्यद, अॅड. जावेद खान, अॅड. सय्यद वसीम, अॅड. नवाज शेख, अॅड. दावर शेख, अॅड. साकीब शेख, अॅड. इरफान शेख, अॅड. अय्युब पठाण, अॅड. शोएब काजी, अॅड. अकबर शेख, अॅड. हमीद जरीवाला, अॅड. अय्याज बेग, अॅड. समीर पटेल, अॅड. अरकान जागीरदार, अॅड. सलमान जी. शेख, अॅड. नुमेर शेख, अॅड. सय्यद ताज, अॅड. दानिश सय्यद आणि अॅड. बैजाद सय्यद या वकिलांसह अमन ओ इन्साफ फाउंडेशन अहमदनगरच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ वकिलांनी विशेष भूमिका बजावली.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे लाठीचार्ज प्रकरणात अटक झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून, स्थानिक पातळीवरही समाधान व्यक्त केले जात आहे. कोर्टाच्या आदेशानंतर नाशिक कारागृहातून सुटका होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.


