कोल्हापूर येथील चंदगडचे भाजपाचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा एका महिलेनं प्रयत्न केल्याचे समोर आले. या प्रकरणी शिवाजी पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 10 लाख रुपये मागितले असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास चितळसर पोलिस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.
अनेक उद्योगपती आणि विविध पक्षातील राजकारण्यांना हनी ट्रम्पचा फटका बसला आहे. त्यातच आता कोल्हापूर येथील चंदगडचे भाजपचे आमदार शिवाजी पाटील हे हनी ट्रम्पचे शिकार होताना वाचले आहेत. ठाण्यातील हिरानंदानी मेडोज या ठिकाणी कार्यालय असणारे पाटील यांनी एक अनोळखी महिलेच्या विरोधात ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी पाटील यांना मागील अनेक दिवसांपासून सदरची महिला वेगवेगळ्या फोन वरून मेसेज आणि फोटो पाठवत होती. तिने शिवाजी पाटील यांच्याकडे 10 लाखाची खंडणी मागितली. शिवाजी पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


