Thursday, October 30, 2025

महानगरपालिकेच्या मालकीच्या जमिनीत बेकायदेशीर विहीर खोदकाम ,दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालकीच्या पिंपळगाव माळवी परिसरातील गट नंबर 1030 मधील जमिनीत बेकायदेशीररित्या विहीर खोदण्यात आली आहे. ही घटना 10 एप्रिल रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींनी पोकलेन मशिन आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने विहीर खोदताना आढळून आले. त्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता प्रदीप ढगे यांनी यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

फिर्यादीत म्हटले आहे की, अशोक जोगदे व किशोर शिखरे (दोघेही रा. धनगरवाडी, ता.जि. अहिल्यानगर) यांनी संगनमताने गट नंबर 1030 या महापालिकेच्या मालकीच्या जागेत कोणतीही अधिकृत परवानगी न घेता विहीर खोदकाम केले. हे खोदकाम केल्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मिसाळ करत आहेत. या प्रकरणामुळे महानगरपालिकेच्या जमिनीवर होणार्‍या अतिक्रमणाच्या घटना पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. यासंदर्भात मनपा प्रशासन आणि पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles