ग्रामसेवा संदेश साहित्यिकांना घडविणारी कार्यशाळा होय : श्री. मेघराज राजेभोसले
गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रामसेवा संदेश हा दिवाळी अंक प्रकाशित करून साहित्यिकांना घडविणारी कार्यशाळा या अंकाचे संपादक ग्रामसेवकांचे नेते श्री. एकनाथराव ढाकणे व सहसंपादक साहित्यिक श्री. राजेंद्र फंड हे घेत असल्याचे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते मान. श्री. मेघराज राजेभोसले यांनी आज पुणे येथे ग्रामसेवा संदेश दिवाळी अंक प्रकाशनप्रसंगी काढले.
प्रारंभी या दिवाळी अंकाचे सहसंपादक श्री. राजेंद्र फंड यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रामसेवा संदेश दिवाळी अंक प्रकाशित करून आजपर्यंत 765 साहित्यिकांना लिखाणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. आमच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध साहित्यिकांच्या साहित्याबरोबरच नवीन साहित्यिकांना ही लिहिते केले जाते याबाबत माहिती दिली.
यावेळी या दिवाळी अंक प्रकाशन समारंभास प्रसिद्ध साहित्यिक श्री. सुदाम विश्वे, प्रसिद्ध उद्योजिका श्रीमती पूजा जालंदर या अंकाचे सहसंपादक श्री. राजेंद्र फंड , सौ. राजश्री फंड हे उपस्थित होते.
आपले मनोगत व्यक्त करतांना ते आणखी म्हणतात की वर्षातून एक दिवाळी अंक काढण्यासाठी जाहिराती मिळविणे व दर्जेदार साहित्य मिळविणे ही तारेवरची कसरत आहे. परंतु ग्रामसेवा संदेश हा दिवाळी अंक श्री. एकनाथराव ढाकणे व श्री. राजेंद्र फंड हे गेल्या 21 वर्षापासून सतत प्रकाशित करतात. तेही साहित्यिकांकडून कोणतीही फी न घेता .ही अभिनंदनीय गोष्ट आहे. दिवाळी अंक चाळला असता खूप चांगले साहित्य यामध्ये आहे. यापुढेही ही साहित्यसेवा अखंड चालू रहावी हीच सदिच्छा.
प्रसिद्ध साहित्यिक श्री. सुदाम विश्वे म्हणाले की अनेक वर्षापासून मी या दिवाळी अंकाचा नियमित साहित्यिक असून या दिवाळी अंकामुळे मला राज्यभर साहित्यिक म्हणून ओळखतात. त्यामुळे मी त्याचा कायम ऋणी आहे.
शेवटी राजश्री फंड यांनी या दिवाळी अंक प्रकाशनास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.
ग्रामसेवा संदेश साहित्यिकांना घडविणारी कार्यशाळा होय : श्री. मेघराज राजेभोसले
- Advertisement -


