केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारनेही महिला आणि मुलींसाठी योजना सुरु केल्या आहेत. राजस्थान सरकारने मुलींसाठी खास लाडो प्रोत्साहन योजना सुरु केली आहे. या योजनेत मुलींना आर्थिक मदत दिली जाते. मुलींच्या नावावर १.५ लाख रुपये जमा केले जातात. राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी ही योजना सुरु केली होती.
२०२४ मध्ये ही योजना सुरु झाली. या योजनेत महिलांना शिक्षणासाठी आणि त्यांना सशक्य बनवण्यासाठी मदत केली जाते. या योजनेचा लाभ कोणाला मिळतो ते जाणून घ्या.लाडो प्रोत्साहन योजनेअंतर्गत सरकारी हॉस्पिटल किंवा सरकारअंतर्गत येणाऱ्या मेडिकल इन्स्टिट्यूशनमध्ये जन्माला आलेल्या मुलींना पैसे दिले जातात. एकूण १.५ लाख रुपये जमा करतात. मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत ७ हप्त्यांमध्ये हे पैसे जमा केले जातात.मुलीच्या जन्मानंतर खात्यात ५००० रुपये जमा केले जातात. यानंतर १ वर्षाची झाल्यावर लस घेतल्यानंतक ५००० रुपये दिले जातात. यानंतर मुलगी पहिलीला गेल्यावर १० हजार रुपये, सहावीला गेल्यावर १५ हजार रुपये आणि मुलगी दहावीला गेल्यावर २० हजार रुपये दिले जातात. मुलगी १२वीत गेल्यावर २५ हजार रुपये दिले जातात. शेवटी मुलीचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर म्हणजे मुलगी २१ वर्षाची झाल्यानंतर खात्यात ७० हजार रुपये जमा केले जातात.
अर्ज कसा करावा?
सरकारी रुग्णालयात मुलींचा जन्म झाल्यानंतर त्याचा रेकॉर्ड PCTS पोर्टलवर टाकला जाईल.
यानंतर मुलीच्या पालकांना SSO पोर्टल sso.rajasthan.gov.in वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर लॉग इन करा.
यानंतर तुम्हाला लाडो प्रोत्साहन योजनेचा फॉर्म भरावा लागेल.
यानंतर जन्मदाखला, कुटुंबाचे आधार कार्ड, डोमिसाइल, बँक अकाउंट ही माहिती भरावी लागेल.
यानंतर फॉर्म भरावा. फॉर्म भरुन झाल्यावर व्हेरिफिकेशन प्रोसेस झाल्यावर तुम्हाला पहिला हप्ता मिळेल.


