Tuesday, October 28, 2025

नगर मनपा आयुक्त करत आहेत जनतेची दिशाभूल , नव्या कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट , माजी नगरसेवक योगीराज गाडे

आहिल्यानगर महानगरपालिका आणि आयुक्त जनतेची दिशाभूल करत असून, नव्या कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट — ही एक मोठी फसवणूक! माजी नगरसेवक योगीराज गाडे

आहिल्यानगर :

अलीकडेच आहिल्यानगर महानगरपालिका व आयुक्त यशवंत डांगे यांनी मोठ्या धुमधडाक्यात शहरासाठी ८० नवीन कचरा संकलन गाड्यांचे उद्घाटन केले. माध्यमांमधून व अधिकृत निवेदनांमधून आयुक्तांनी शहरातील कचऱ्याचा प्रश्न आता संपला असल्याचे जाहीर केले. परंतु वास्तव मात्र याच्या नेमक्या उलट आहे.

महानगरपालिकेच्या खर्चातून नव्हे, तर जनतेच्या कराच्या पैशातून या सर्व कचरा गाड्या विकत घेतल्या गेल्या आहेत. नागरिकांनी प्रामाणिकपणे भरलेले कर, हाच या कचरा संकलन योजनेचा पाया आहे. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि अगदी आयुक्त यांचे वेतनसुद्धा ह्याच करदात्यांच्या पैशांतून जाते — हे विसरून चालणार नाही.

नगरसेवक योगिराज गाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या नव्या कचरा गाड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान एक अत्यंत गंभीर बाब आमच्या निदर्शनास आली —

या गाड्यांवरील निळे आणि हिरवे रंग नागरिकांना भ्रमित करण्यासाठी लावण्यात आले आहेत. बाहेरून पाहता, एक बाजू ओल्या कचऱ्यासाठी आणि दुसरी बाजू सुका कचरा यासाठी असल्याचे दाखवले जाते. पण प्रत्यक्षात, गाडीच्या आत एकही स्वतंत्र कप्पा नाही. ओला आणि सुका कचरा दोन्ही एकाच ठिकाणी एकत्र टाकला जात आहे.

यामुळे, नागरिकांची फसवणूक होत असून, हा प्रकार म्हणजे महानगरपालिका आणि आयुक्तांकडून जनतेची दिशाभूल व करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे. काही गाड्यांची स्थिती तर सुरू होण्यापूर्वीच दयनीय आहे — सायरन, ध्वनी व्यवस्था व इतर आवश्यक सुविधा उपलब्धच नाहीत.

आहिल्यानगर महानगरपालिकेने या ८० गाड्यांना “शहर स्वच्छतेचे समाधान” म्हणून दाखवले आहे, परंतु प्रत्यक्षात शहराला स्वच्छ करण्यासाठी किमान १३० पेक्षा अधिक गाड्यांची आवश्यकता आहे. केवळ उद्घाटनाचे फोटोसेशन आणि प्रसिद्धी हेच उद्दिष्ट दिसते.

योगीराज गाडे म्हणाले
आयुक्त यशवंत डांगे आणि महानगरपालिका प्रशासनावर “गुन्हा दाखल” करण्याची गरज आहे. कारण हा प्रकार म्हणजे जनतेचा विश्वासघात आणि करदात्यांच्या पैशांची उघड लूट आहे.

नागरिकांनी अशा दिखाऊ योजना आणि फसव्या आश्वासनांपासून सावध राहावे.
खऱ्या अर्थाने स्वच्छ, जबाबदार आणि पारदर्शक प्रशासनाची मागणी आता प्रत्येक नागरिकाने करणे अत्यावश्यक आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles