शनिशिंगणापुर परिसरामध्ये गावठी कट्टा बाळगणारे आरोपीकडुन 02 गावठी कट्टे व 08 जिवंत काडतुस हस्तगत, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई.
–
मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/दिपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, शाहिद शेख, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, विशाल तनपुरे, भगवान थोरात, रमिझराजा आतार, प्रशांत राठोड, महादेव भांड यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
दिनांक 27/10/2025 रोजी नमुद पथक हे नेवासा परिसरामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत भारत सोपान कापसे रा. कांगोणी, ता. नेवासा याने गावठी पिस्टल विक्रीसाठी आणलेले असल्याची माहिती मिळाली. पथकाने व्यवसायीक कौशल्याचे आधारे सदर इसमाचा शोध घेता तो कांगोणी गावामध्ये असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने बातमीतील ठिकाणी जावुन नमुद इसमाचा शोध घेत असतांना भारत सोपान कापसे वय 27 वर्षे, रा. मराठी शाळेजवळ, कांगोणी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर हा मिळुन आला. सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचेकडे अग्निशस्त्राबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने दोन गावठी पिस्टल व काडतुसे विक्रीसाठी आणुन त्याचे राहते घरामध्ये ठेवलेले असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमाचे घरामधुन 60,000/- रुपये किमतीचे 02 गावठी पिस्टल (अग्निशस्त्रे) व 4000/- रुपये किमतीचे 08 जिवंत काडतुसे असा एकुण 64,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील इसमाविरुध्द पोना/437 सोमनाथ आसमानराव झांबरे नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन येथे आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
Ahilyanagar crime :गावठी पिस्टल बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या : जिवंत काडतुसांसह मुद्देमाल जप्त
- Advertisement -


