श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुनील भगवंत वाळके (रा. श्रीगोंदा) याच्याविरोधात एका विवाहित महिलेने अत्याचाराची फिर्याद श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.3) दाखल केली आहे. मागील नऊ वर्षांपासून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार होत असल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.पीडितेच्या फिर्यादीनुसार, तिचा पती 2016 पासून वाळके यांच्या संपर्कात असून, त्याच काळात वाळके यांनी पीडितेचा विश्वास संपादन केला. फेसबुकवरील संवादातून त्यांनी मी पत्नीला घटस्फोट देणार आहे, तू माझ्या सोबत रहा असे सांगून भावनिक व सामाजिक अमिष दाखवले. त्यानंतर सगळं आपल्या पतीला सांगेन अशी धमकी देऊन एका हॉटेलवर नेऊन 2016 साली पहिल्यांदा अत्याचार केला, असे फिर्यादीने नमूद केले आहे.यानंतरही वाळके याने बेलवंडी फाटा परिसरातून तिला बोलावून घेत संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेलमध्ये नेऊन अनेक वेळा अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील काही वर्षांपर्यंत, पीडितेचा पती शेतात गेला असताना, रात्री उशिरा वाळके तिच्या घरी येऊन जबरदस्तीचे संबंध ठेवत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिने ही माहिती वाळके याच्या पत्नीला सांगितली असता तिला उलट धमक्या देण्यात आल्या. अखेर, 19 ऑक्टोबर 2025 रोजी घटस्थापनेच्या दिवशीही वाळके याने घरी येऊन पुन्हा अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
Ahilyanagar Crime: माजी नगरसेवक वाळके विरोधात अत्याचाराचा गुन्हा
- Advertisement -


