सोनं-चांदीच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याचे दर कधी कमी तर कधी वाढत आहेत. बुधवारी सोन्याच्या दरात घट झाली होती तर आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४३०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीमध्ये १ रुपयांनी वाढ झाली आहे. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी तुम्ही आज त्यांचे नेमके दर किती आहेत ते घ्या जाणून…
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ४३० रुपयांनी वाढले आहेत. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,२१,९१० रुपये खर्च करावे लागणार आहे. हे सोनं बुधवारी १,२१,४८० रुपयांना विकले गेले होते. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४,३०० रुपयांनी वाढ झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,१९,१०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हेच सोनं बुधवारी १२,१४,८०० रुपयांना विकले गेले होते. सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशावर ताण येणार आहे.
आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,११,७५० रुपये मोजावे लागणार आहे. हे सोनं बुधवार १,११,३५० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ४,००० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,१७,५०० रुपये खर्च करावे लागतील. हेच सोनं बुधवारी ११,१३,५०० रुपयांना विकले गेले होते.
२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ३२० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९१,४३० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हे सोनं बुधवारी ९१,११० रुपये खर्च करावे लागले. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,२०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,१४,३०० रुपये मोजावे लागणार आहेत. बुधवारी हेच सोनं खरेदीसाठी ९,११,१०० रुपयांना विकले गेले होते.
सोन्यासोबतच चांदीचे दरात देखील वाढ झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरामध्ये १ रुपयांनी वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी १५१.५० रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये १००० रुपयांनी वाढ झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,५१,५०० रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे सोन्यासोबत चांदी खरेदी करताना तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.


