Thursday, November 6, 2025

दिव्यांग मुलांच्या पालकांना कायदेशिर पालकत्व प्रमाणपत्राचे वितरण

दिव्यांग मुलांच्या पालकांना कायदेशिर पालकत्व प्रमाणपत्राचे वितरण

अहिल्यानगर जिल्हयातील ०७ दिव्यांग मतिमंद मुलांचे कायदेशिर पालकत्व प्रमाणपत्राचे वितरण
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री. देविदास कोकाटे, यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. नॅशनल ट्रस्ट फॉर वेलफेअर ऑफ परर्सन्स विथ ऑटीझम, सेरेबल पाल्सी, मेंटल रिटाडेशन ॲन्ड मल्टीपल डिसेंबोलोटो ॲक्ट १९९९ च्या कायदयातील कलम १४ (४) मधील तरतूदीनुसार जिल्हा परिषद, अहिल्यानगर येथील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय येथे हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, श्री. देविदास कोकाटे म्हणाले की, या कायदेशिर पालकत्व प्रमाणपत्राचा उपयोग केंद्र शासन व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणा-या योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्तींना मिळवून देण्यासाठी व दिव्यांग व्यक्तीना समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा व दिव्यांग पाल्यांचे भवितव्य उज्वल करण्याचे त्यांनी यावेळी आवाहान केले.यावेळी श्री. ज्ञानेश्वर त्रिंबक अंदुरे, श्री. ज्ञानदेव अंबादास गांगर्डे, श्री. विजय शिवाजी काळे, श्री. गोरख सोपान पावडे, श्री. सुरेश अश्रु तावरे, श्री. अप्पा सिताराम पारखे, श्री. प्रकाश विठठल साळुंके आदी दिव्यांग व्यक्तीच्या पालकांना कायदेशिर पालकत्व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.कायदेशिर पालकत्व देण्यामध्ये जिल्हा स्थानिय स्तर समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, डॉ. पंकज आशिया समिती सदस्य डॉ. शंकर शेळके, श्री. संतोष सरवदे यांचे विशेष सहकार्य लाभले.

या कार्यक्रमास विजय बळीद,गिन्यानदेव जाधव, सचिन तरवडे,तुषार कवडे,मोहन कुंभखेले, सुयोग निमसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles