Thursday, November 6, 2025

महापालिका निवडणूक; अहिल्यानगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोठा निर्णय

अहिल्यानगर-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक संपूर्ण ताकतीने लढविण्याचा निर्णय जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पदाधिकारी बैठकीत घेण्यात आला. सदर बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांची व इच्छुक उमेदवारांचे मते जाणून घेण्यात आली. तसेच नवीन प्रभाग रचनेचा निवडणूक आराखडा तयार करण्यात आला असून शहरातील सर्व प्रभागांमध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी करून बैठकीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.मनसे आगामी महानगर पालिका निवडणुकीसाठी सज्ज असून पूर्ण ताकदीने हि निवडणूक लढवणार असल्याचे मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांनी म्हटले आहे.

शहरातील विविध समस्या व नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम या बैठकीत घेण्यात आले. सद्यस्थितीत शहराची अवस्था बकाल बनत चालली आहे, शहरातील काही ठराविक भागाचा विकास होत आहे आणि इतर ठिकाणी विकासाच्या नावाखाली अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे अधिकाऱ्यांना हाताशी धरून करण्यात येत आहे. शहरात कोणतेच नियोजनबद्ध काम होताना दिसून येत नसून मनमानी पद्धतीने सर्वत्र शहराची नांगरट केल्यासारखी अवस्था करून ठेवली आहे. त्यातील अनेक कामे एकाच ठेकेदाराला देण्यात आल्यामुळे त्याची मनमानी सामान्य नागरिकांना वेठीस धरणारी आहे. याला वाचा फोडण्याचे काम आगामी काळात हाती घ्यावे लागणार आहे, तसेच आगामी निवडणूक स्वबळावर लढवायची की आघाडी बरोबर जाऊन लढवायची याबाबत मते जाणून घेण्यात आली, याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे व पुढील दिशा वरिष्ठांच्या आदेशाने ठरविण्यात येणार आहे.
सदर बैठकीस जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशिनकर, उपजिल्हाध्यक्ष मनोज राऊत विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनिता दिघे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, वाहतूक सेना शहराध्यक्ष अशोक दातरंगे, शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे, शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे, शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे, शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी, शहर उपाध्यक्ष किरण रोकडे, विभाग अध्यक्ष प्रवीण गायकवाड, प्रशांत जाधव, प्रमोद ठाकूर, अभिषेक कलमदाने, अंबरनाथ भालसिंग, आरती उफाडे, श्रद्धा खोंडे आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles