Friday, February 20, 2026

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक पाऊल पुढे, भाजप-शिवसेनेच्या आधी जाहीर केला उमेदवार

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. येत्या २ आणि ३ डिसेंबरला स्थानिक निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्यात जय्यत तयारी सुरु झाली आहे. अशातच आता बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. शितल महेश दाभाडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून आदीकृतरित्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार हे महानगरपालिका,जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे. विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर आता अजितदादांनी स्थानिकसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी लागली आहे. अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पहिलाच उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषदेमध्ये निवडणूक होत आहे. त्यापैकी गेवराई नगर परिषदेमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांच्या गटाकडून माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांच्या पत्नी शितल महेश दाभाडे यांना उमेदवारी देत थेट विजयसिंह पंडित यांच्याकडून या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने मंगळवारी ४ नोव्हेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तारखा जाहीर केल्या. येत्या २ आणि ३ डिसेंबर रोजी या निवडणूका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रभरात नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. ३ डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles