Friday, February 20, 2026

Gold- Price: ग्राहकांसाठी खुशखबर! सोन्याच्या दरात घसरण १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव

सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी, शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १२१,३५० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १११,२३८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १४८,४४० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,४८४ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात


शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ११०,९९९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत १२१,०९० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११०,९९९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२१,०९० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११०,९९९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२१,०९० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११०,९९९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२१,०९० रुपये आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles