दरेवाडी जिल्हा परिषद गटासाठी निळू ठोंबरे यांच्या उमेदवारीसाठी नारायणडोह ग्रामस्थ एकदिलाने शिवसेना जिल्हाप्रमुखांकडे
शशिकांत गाडे यांची भेट घेऊन उमेदवारीचा दावा सादर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील दरेवाडी जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जातीसाठी राखीव पडल्याने मौजे नारायणडोह ग्रामपंचायत सदस्य निळू किसन ठोंबरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांची असंख्य कार्यकर्त्यांसह भेट घेऊन उमेदवारीचा दावा सादर केला.
या भेटीत ठोंबरे यांनी आपल्या गटातील विकासकामे, ग्रामपातळीवरील जनसंपर्क आणि सामाजिक बांधिलकी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यावर प्रतिसाद देताना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आश्वासन देत ठोंबरे यांच्या कार्याची प्रशंसा केली.
निळू ठोंबरे हे नारायणडोह ग्रामपंचायतीचे अत्यंत लोकप्रिय सदस्य असून मागील पंचवार्षिकेत विक्रमी मतांनी निवडून आले आहेत. त्यांच्या कार्यकाळात गावातील विकासकामांना गती मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये त्यांच्याबद्दल चांगली भावना आहे. संपूर्ण नारायणडोह ग्रामस्थ ठोंबरे यांच्या पाठीशी उभे असल्याचेही या भेटीत स्पष्टपणे दिसून आले.
या प्रसंगी अनेक शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. ठोंबरे यांच्या उमेदवारीच्या दाव्यामुळे दरेवाडी जिल्हा परिषद गटातील निवडणूक समीकरणांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगर तालुक्यातील दरेवाडी जिल्हा परिषद गटासाठी उमेदवारीसाठी शशिकांत गाडे यांची भेट घेऊन उमेदवारीचा दावा
- Advertisement -


