स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या स्टार प्रचाराकांची यादी जाहीर ; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील….

निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यात दोन डिसेंबरला नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला निवडणुकीची मतमोजणी आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, सर्वच पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. भाजपकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, पीयूष गोयल, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, मुलरलीधर मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले या नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात काही ठिकाणी भाजप ही निवडणूक महायुतीमध्ये लढणार आहे, तर काही ठिकाणी निवडणूक स्वबळावर लढवली जाणार आहे. सध्याचं राजकीय वतावरण पहाता सर्व पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे, कारण यानंतर आता लगेच महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं होतं, त्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे मतदार कोणाच्या बाजुने कौल देणार हे देखील पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles