केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत ७ नवीन अपडेट समोर

केंद्रीय कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आता आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या दृष्टीने सरकारने पाऊले उचलली आहेत. सरकारी यासाठी टर्म्स ऑफ रेफरन्स लागू केले आहेत. याचसोबत आठव्या वेतन आयोगाबाबत समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. आठव्या वेतन आयोगाबाबत ७ अपडेट समोर आले आहेत.

1. १८ महिन्यात येणार रिपोर्ट

आठव्या वेतन आयोगासाठी स्थापन केलेल्या समितीला १८ महिन्यात रिपोर्ट देण्यास सांगितले आहे. जर रिपोर्ट वेळेवर आला तर पगार आणि पेन्शनमध्ये वाढ लवकरच केली जाईल.

2. आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग हा २०२६ पासून लागू होणार आहे.परंतु या वेतन आयोगाअंतर्गत पगारवाढ येण्यासाठी उशिर होऊ शकतो. यामध्ये काही महिन्यानंतर एरियर दिला जाईल.

3. आयोगाची समिती

आयोगात न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या अध्यक्ष असणार आहे. प्राध्यापक पुलक घोष हे अर्धवेळ सदस्य तर पंकज जैन हे सचिव म्हणून काम करतील.

4. पगार आणि पेन्शनमध्ये वाढ

आठव्या वेतन आयोगात पगार आणि पेन्शन किती वाढणार असा प्रश्न विचारला जात आहे. मागील ट्रेंडनुसार पगार आणि पेन्शनमध्ये ३० ते ३४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

5. फिटमेंट फॅक्टर

केंद्रीय कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. सध्या फिटमेंट फॅक्टर २.५७ आहे. आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.८६ होण्याची शक्यता आहे.

6. मूळ वेतनात वाढ

कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीत वाढ होणार आहे. बेसिक सॅलरीत वाढ झाल्यावर इतर भत्तेदेखील वाढणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे.

7. नवीन पगारवाढ कधीपासून येणार?

पगारवाढ ही १ जानेवारी २०२६ पासून लागू होईल. म्हणजे अहवाल येण्यापूर्वी तसेच नवीन पगारवाढीची अंबलबजावणी होईपर्यंतच्या महिन्याचे एरियर दिला जाणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles