सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज १३ नोव्हेंबर २०२५ रोजी, गुरुवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात घसरणीनंतर किंचित वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १३ नोव्हेंबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १२७,५३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ११६,९०३ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १६५,२९० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,६५३ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ११६,६९२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत १२७,३०० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११६,६९२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२७,३०० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११६,६९२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२७,३०० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११६,६९२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२७,३०० रुपये आहे.


