Thursday, October 30, 2025

नगर शहरात ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुख पदाचा तडका फडकी राजीनामा

अहिल्यानगर शिवसेना ठाकरे गटाचे दीपक भोसले यांचा उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा

वरिष्ठ नेत्यांच्या दुर्लक्षामुळे शिवसेना ठाकरे गट संकटात – दीपक भोसले

नगर : शहरातील जिल्ह्यातील शिवसैनिकांकडे पक्ष प्रमुख उदधव बाळासाहेब ठाकरे यांचे दुर्लक्ष झाले आहे, तसेच स्थानिक पातळीवर, जिल्ह्यात व शहरात पक्षाला ताकद देणे गरजेचे असताना शिवसेनेला ती ताकद ठाकरे शिवसेनेकडून मिळत नाही. त्यामुळे आपल्या पक्षातील नगरसेवक पदाधिकारी हे इतर पक्षात गेले आहे आणि जातही आहे हे पक्षाच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही, संघटना वाढण्यासाठी शहरात जिल्ह्यात मा.आ. स्व. अनिल भैय्या राठोड, आणि जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी जे कष्ट घेतले आहे, त्याचबरोबर शिवसैनिक पदाधिकारी यांची मोठी फळी तयार झाली होती मात्र याच शिवसैनिकांना ताकद मिळत नसल्याने मी माझ्या पक्षातील उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा देत असून पक्षाचा व बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याची माहिती दिपक भोसले यांनी दिली
अहिल्यानगर शिवसेना ठाकरे गटाचे दीपक भोसले यांचा उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्याकडे पत्राद्वारे दिला आहे. दीपक भोसले यांनी राजीनामा पत्रात म्हटलंय की, आमच्या सारख्या छोटया शिवसैनिकाला तसेच जे सध्या ठाकरे सेनेत काम करत आहे अशा शिवसैनिकांकडे ठाकरे सेनेमधील काही स्वयंघोषित नेत्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. अशी भावना आता माझी झाली आहे. ज्या कामाची जबाबदारी मला पक्षाने, सघटनेने तसेच स्थानिक नेत्यानी मला दिली होती. त्या त्या जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पार पाडल्या आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणुका असो पंचायत समिती,जिल्हा परिषद, विधानसभा लोकसभेची अनेक वेळेस जबाबदारी मला दिली ती व्यवस्थितरित्या प्रामाणिकपणे पार पाडली तसेच कसलाही वैयक्तिक आर्थिक राजकीय स्वार्थ न बाळगता. संघटना वाढीसाठी शहरात व जिल्ह्यात यांनी काम केलं आहे ते मा.आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या मर्जीतील विश्वासू शिवसैनिक होते त्यांना दोन वेळेस स्थानिक स्वराज्य पातळीवरील निवडणूक लढण्याची संधी महापालिकेचे शिवसेना उपनेते स्व. अनिल भैय्या राठोड यांनी दोन वेळेस देऊ केली. पण ती नाकारली होती अनेक पक्ष सोडून गेलेत तरीही मी ठाकरे सेना कधी सोडली नाही. पण आता पक्षाची सध्याची परिस्थिती वेगळी आहे, स्व. मा. आ. अनिल भैय्या राठोड हे गेल्यानंतर वरिष्ठ शिवसेना संघटनेचे पक्षनेते यांनी संपूर्णपणे नगर शहराच्या ठाकरे शिवसेनेकडे व जिल्ह्यातील शिवसेनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे त्यामुळे मी नाराज आहे पक्ष संघटनेवर तसेच मध्यंतरी एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये नगर शहरातील ठाकरे सेनेचे बरेच नगरसेवक पदाधिकारी यांनी प्रवेश केला. कारण वरिष्ठांचे संपूर्णपणे दुर्लक्ष आहे.
शहरातली शिवसेनेकडे व जिल्ह्यातील शिवसेनेकडे आज बघितल्यास शहरात ठाकरे सेना पक्ष हा संपुष्टात आला आहे अशी भावना निर्माण व्हायला लागली आहे शिवसैनिकांमध्ये मधल्या काळात विधानसभेचे तिकीट नाकारले त्या वेळेसही ठाकरे सेनेकडे उमेदवार असूनही वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारी दिली नाही. जे इच्छुक होते त्यांना पक्ष संघटना ताकद देत नाही त्याची एक नाराजी ठाकरे सेनेच्या पदाधिकारी नगरसेवक यांच्या मनामध्ये होती, त्यामुळे हे लोक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटात गेले. तसेच जे पक्षात आहे त्यांच्याकडे वरिष्ठ लक्ष देत नाही त्या मुळे संघटना या शहरात जिल्ह्यात कशी वाढणार? स्थानिक पातळीवर जर ताकद देण्यात आली तर संघटना वाढेल जिवंत राहील. असा प्रश्न निर्माण होत असून यामुळेच मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे तसेच आता माझा इतर कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही, मी मनापासून मी हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शेवटपर्यंत शिवसैनिकच असणार आहे.असे दीपक भोसले यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles