Tuesday, March 3, 2026

जनावरांच्या गोचीड तापावर ‘रक्षाव्हॅक टी’ हि लस उपयुक्त

जनावरांच्या गोचीड तापावर ‘रक्षाव्हॅक टी’ हि लस उपयुक्त- विजय मुळीक

जिल्हा परिषदेत *ASCAD अंतर्गत कार्यशाळा संपन्न

पशुसंवर्धन विभाग अ हिल्यानगर, व इंडियन इम्म्युनालॉजिकल्स लि. हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषदेचे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये पार पडले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. उमेश पाटील, डॉ सुनील लहाने उपायुक्त रोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे,सहाय्यक आयुक्त डॉ. दशरथ दिघे, डॉ. अरुण हरिश्चंद्रे,डॉ. संतोष पालवे, श्री वेंकटरमना, डॉ. सर्वेश तायशेटे
आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. उमेश पाटील म्हणाले जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील सर्व सहाय्यक आयुक्त ,पशुधन विकास अधिकारी ,सहाय्यक पशुधन अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांना हे प्रशिक्षण देण्यात आले जनावरांना विविध प्रकारच्या साथीचे आजार प्रतिबंधक लसीकरण बाबत सविस्तर मार्गदर्शन केले त्याचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होईल .

यावेळी विजय मुळीक आपल्या भाषणात म्हणाले अहिल्यानगर जिल्हा हा पशुपालन क्षेत्रात आघाडीवर असून राज्यात दूध उत्पादनात अग्रेसर आहे. पशुपालकांनी शास्त्रीय दृष्ट्या व्यवस्थापन केल्यास दूध उत्पादनावरील होणारा खर्च कमी होईल तसेच पशुपालकांचे उत्पादन वाढवण्यास मदत होईल. या प्रकारच्या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील शेतकरी पशु पालकांना नक्कीच फायदा होईल .
इंडियन इम्म्युनालॉजिकल्सचे विभाग प्रमुख श्री वेंकटरमना यांनी आपल्या भाषणात या कंपनीच्या माध्यमातून गोचीड ताप हा गोचडीमुळे होणारा एक संसर्गजन्य आजार असून संकरित जनावरांमध्ये प्रामुख्याने आढळून येतो. नगर जिल्हा दूध उत्पादनामध्ये अग्रेसर असून गोचीड तापामुळे दूध उत्पादनावर याचा परिणाम होत आहे .गोचीड तापावर होणारा औषधाचा खर्च हा प्रती जनावर चार ते पाच हजार रुपये येतो व रोगप्रतिकारक शक्तीवर त्याचा परिणाम होतो. सदर कंपनीची या रोगावर ‘रक्षाव्हॅक टी” या नावाने लस उपलब्ध असून ही वर्षातून एकदाच जनावरांना द्यायची असते .केंद्र शासन व राज्य शासन यांच्या विद्यमाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही लस उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना ही लस मोफत पुरवठा केला जातो

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश घुले यांनी केले तर आभार डॉ. संतोष पालवे यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles