लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. आता केवायसी करण्यासाठी शेवटचे १५ दिवस उरले आहेत. केवायसीची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर केवायसी करायचे आहे. अजूनही लाखो महिलांनी केवायसी केली नसल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे. जर लाडक्या बहिणींनी केवायसी केले नाही तर त्यांचा लाभ बंद केला जाऊ शकतो. दरम्यान, केवायसीची जबाबदारी ही अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवा. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी केवायसी करणे बंधनकारक केले आहे. बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाने ही प्रोसेस अनिवार्य केली आहे. दरम्यान, आता ई केवायसीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे.
ई केवायसी करताना अजूनही लाभार्थी महिलांना खूप अडचणी येत आहेत. सर्व्हर डाउन किंवा ओटीपी येत नसल्याने ही प्रोसेस होत नाही. त्यामुळेच आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांची केवायसी करणार आहेत.केवायसी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी संगणकीय प्रणालीत सुधारणा केली होती. तरीही महिलांना अडचणी येत आहेत. यासाठीच महिला व बालविकास विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.
ई केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. याचसोबत ई केवायसी प्रक्रियेत जर कोणतीही चूक झाली असेल तर त्यासाठी एक संधी मिळणार आहे. तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन ही चूक सुधारु शकतात. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे.


