Saturday, February 21, 2026

पाथर्डी तालुक्यातील दरोडा प्रकरणातील 03 फरार आरोपी जेरबंद

खांडगांव ता. पाथर्डी येथील दरोडा प्रकरणातील 03 फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचेकडुन जेरबंद, आरोपींकडुन इतर 05 जबरी चोरीचे गुन्हे उघड

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 31/10/2025 रोजी रात्री 10/00 वा.चे सुमारास त्रिभुवनवाडी ते खांडगाव जाणारे रोडवर खांडगाव ता. पाथर्डी येथे ट्रॅव्हल्सला पांढ-या रंगाची स्विप्ट कार आडवी लावुन ती मधुन पाच ते सहा चोरट्याने खाली उतरुन ट्रॅव्हल्समध्ये जबरदस्तीने चढुन जीवे ठार मारण्याची धमकी देवुन त्यांचे जवळ असलेल्या गावठी पिस्तुल व चाकु सारखे हत्याराचा धाक दाखवुन सोन्याचे दागिणे, रोख रक्कम जबरदस्तीने काढुन गेले आहे. फिर्यादी पवन सुखदेव खैरनार वय – 36 वर्षे रा. साईकृष्णा अपार्टमेंट, प्लॅट नंबर 7/8 जेल रोड नाशिक जि.नाशिंक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 1227/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331,310(2) प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील 04 आरोपी यापुर्वी अटक करण्यात आलेले असुन 05 आरोपी फरार होते.
मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांना वरील गुन्ह्यातील फरार आरोपीची माहिती काढुन त्यांना ताब्यात घेणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.
वर नमुद सुचनेनुसार पो.नि. श्री किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/ हरिष भोये, पोउपनि/राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, राहुल द्वारके, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, प्रकाश मांडगे, बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, सतिष भवर, आकाश काळे, प्रशांत राठोड, चाकल चंद्रकांत कुसळकर, भगवान धुळे यांचे पथक तयार करुन आरोपीचे शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.
पथक वरील गुन्ह्यातील फरार आरोपींची शोध घेत असतांना दिनांक 14/12/2025 रोजी पथकास गुन्ह्यातील आरोपी 1) सलमान पठाण,2) ओम वांढेकर, 3) सुफीयान भालदार हे करंजी घाटातील दगडवाडी शिवारातील डोंगरामध्ये असल्याचे माहिती मिळाली. पथकाने तात्त्काळ दगडवाडी शिवार करंजी येथील डोंगरामध्ये जावुन आरोपीचा शोध घेत असतांना 3 इसम पथकास पाहुन झुडुपामध्ये पळुन जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) सलमान जमादार पठाण वय 24 रा. बस स्टॅन्ड मागे, करंजी, ता.पाथर्डी जि. अहिल्यानगर, 2) ओम बाळासाहेब वांढेकर वय 19 रा. खांडगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर, 3) सोफीयान फारुख भालदार वय 19 रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव, ता.शेवगाव जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
ताब्यातील आरोपींकडे सखोल व बारकाईने तपास केला असता त्यांनी वरील गुन्ह्याची कबुली दिली आहे. पथकाने ताब्यातील आरोपींकडे आणखी इतर काही गुन्हे केले आहेत काय याबाबत विचारपुस करता आरोपींकडुन खालीलप्रमाणे जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles