अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती !
अहिल्यानगर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रभाग क्र. 1-17 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवार दि.२१-१२-२०२५ घेण्यात येणार आहे.
या मुलाखती अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेशजी लंके, अहिल्यानगर जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, मा.आ.जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर तसेच शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कार्याध्यक्ष नामदेव पवार,विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी तसेच पक्षाच्या निवडणूक समितीच्या उपस्थितीत पार पडतील. अशी माहिती शहरजिल्हाध्यक्ष अभिषेकजी कळमकर यांच्याकडून देण्यात आली आहे.
मुलाखतीचा तपशील खालीलप्रमाणे:
– दिनांक: रविवार २१ डिसेंबर २०२५
– वेळ: सकाळी ११.०० वाजेपासून
– ठिकाण: पक्ष कार्यालय,राष्ट्रवादी भवन,स्टेशन रोड अहिल्यानगर
नोंद: मुलाखतीला येण्यापूर्वी संबंधित उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज करणे बंधनकारक आहे.
उमेदवारांसाठी ठळक सूचना-
मुलाखतीसाठी येणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांनी खालील बाबींची पूर्तता करणे अनिवार्य आहे:
– कार्याचा लेखाजोखा: उमेदवारांनी आजवर आपल्या प्रभागासाठी अथवा समाजासाठी केलेल्या कार्याचा सविस्तर लेखाजोखा सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
– परिचय पत्रक: उमेदवाराने आपले स्वतःचे परिचय पत्रक सोबत ठेवावे.
– विकासाच्या संकल्पना: उमेदवाराला अहिल्यानगर शहराच्या तसेच स्वतःच्या प्रभागाच्या विकासासाठीच्या संकल्पना ठाऊक असणे गरजेचे आहे.
– कागदपत्रे: आवश्यक ती स्वतःची सर्व मूळ कागदपत्रे (उदा. शैक्षणिक, निवडणूक संबंधित, वैयक्तिक) सोबत ठेवावीत.
– राखीव प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी जात प्रमाणपत्र किंवा त्या संबंधित कागदपत्र सोबत घेऊन येणे अनिवार्य.
अहिल्यानगर शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून लढण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी,कार्यकर्त्यांनी याची नोंद घावी.


