Friday, February 20, 2026

बापरे! नारळ सोलण्याची ‘अशी’ स्टाईल या महिलेला कोयत्याची गरज सुद्धा नाही, ती फक्त आणि फक्त… व्हिडीओ

हॉटेल असो दुकान असो किंवा एखादा स्टॉल प्रत्येक व्यापाऱ्याला त्याचा व्यवसाय चालवण्यासाठी ग्राहकांना त्याच्या व्यवसायाकडे आकर्षित करावे लागते. काम करताना, ग्राहकांना सांभाळताना सतत इनोव्हेशन करीत ग्राहकांच्या मनात जागा मिळवायची असते. आता सोशल मिडीयावर अशाच एका नारळ पाणी विकणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये नारळ सोलण्याची तिची कला पाहून तुम्हीही चकित व्हाल एवढं तर नक्कीच…

नारळ पाणी भारतीयांच्या आवडत्या नैसर्गिक पेयांपैकी एक आहे. नारळ फोडल्यानंतर आतील थंडगार पाणी प्यायलवर मऊ मलई दिसली की, बोनस मिळाल्यासारखं आनंद होतो. पण, पाणी आणि स्वादिष्ट मलई काढण्यासाठी सगळ्यात आधी नारळ सोलावा लागतो. यासाठी सहसा कोयत्याचा उपयोग करतात. पण, या महिलेला कोयत्याची गरज सुद्धा नाही, ती फक्त आणि फक्त तिच्या दाताने नारळ सोलून दाखवते.

@india_eat_mania या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ओडिशातील महिलेने असे काही केलं की, जे आपल्यापैकी बहुतेक जण कधीही करण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाहीत. लाल साडी परिधान करून, ती हिरवा नारळ हातात उचलते आणि चक्क दातांनी तो सोलायला सुरुवात करते. हो, तुम्ही बरोबर वाचलंत; चाकू नाही, हत्यार नाही, तर तिच्या दातांनी नारळ सोलायला सुरुवात करते.

महिला हिरव्या नारळाच्या करवंटीचा चावा घेते आणि काही सेकंदांत संपूर्ण बाहेरचा कवच काढून टाकते. करवंटी काढून झाल्यावर ती नारळाचं पाणी पेपर कपमध्ये ओतते. शेवटी ती अभिमानाने हसते. पण, नेटकरी हा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत आणि “कोणतं टूथपेस्ट वापरतेस”, “तुमच्या टूथपेस्ट मध्ये मीठ आहे का”, “वाह ताई गजब टॅलेंट”, “आमच्या ओडिशामध्ये असंच असतं” , “अरे पण दातांनी सोललेल्या नारळाचं पाणी प्यायचं कसं” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles