Saturday, February 21, 2026

अहिल्यानगरमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये राडा; कर्मचाऱ्यांला मारहाण

अहिल्यानगर येथील जीपीओ पोस्ट ऑफिसमध्ये शासकीय कामकाज सुरू असताना एका युवकाने गोंधळ घालून कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. आरोपीने वरिष्ठ कर्मचाऱ्याला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॉबीन अजित महाडकर (रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपुर) असे आरोपीचे नाव आहे.

सदरची घटना १६ डिसेंबर २०२५ रोजी पोस्ट ऑफिसमध्ये घडली. आरोपीने आरडाओरडा करत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि कामात व्यत्यय निर्माण केला. फिर्यादी आसीफ शेख (वय ५७, रा. मुकुंदनगर), जे पोस्ट ऑफिसमध्ये काम करतात, यांनी रॉबीनला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु रॉबीनने आसीफ शेख यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. मारहाणीमुळे शेख यांना दुखापत झाली असून, त्यांनी जिल्हा रुग्णलयात उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात रॉबीन महाडकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles