नगर तालुक्यात युवतीचा विनयभंग ;पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर-२३ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली. मुख्य आरोपी अजय ठाणगे आणि इतर दोन अनोळखी इसमांविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना वाकोडी फाटा, सोलापूर रोड परिसरात १४ डिसेंबर रोजी घडली. आरोपीने मोटारसायकलवरून तक्रारदार युवतीचा पाठलाग केला. रस्ता अडवून मुख्य आरोपी अजय ठाणगे याने युवतीचा उजवा हात पकडला. लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यासोबतच आरोपींनी पीडित युवतीला शिवीगाळ करत ‘पाहून घेतो’ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी अजय ठाणगे आणि इतर दोन अनोळखी इसमांविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत असून, महिलांवरील वाढत्या अत्याचारांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘नायलॉन मांजा’ खरेदी, विक्री; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन व चायनीज मांजाच्या विक्री विरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली असून, शास्त्रीनगर परिसरात कोतवाली पोलिसांनी ‘नायलॉन मांजा’ खरेदी, विक्री सेंटरवर छापा टाकला. या कारवाईत ९० हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सूरज दिलीप कदम यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी एकनाथ अशोक वीरकर (वय ३५ वर्षे, रा. शास्त्रीनगर, अहिल्यानगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमवार दि. १५ डिसेंबर रोजी शास्त्रीनगर, केडगाव परिसरात वरील आरोपी ‘नायलॉन मांजा’ ची विक्री करतांना आढळला. त्याचे ताब्यात बंदी घातलेला ‘मोनो केटीसी’ आणि ‘हिरो प्लस’ या नावाच्या नायलॉन मांजाचे बंडल पोलिसांनी जप्त केले. ​हा मांजा प्लास्टिक किंवा कृत्रिम पक्क्या धाग्याने बनलेला असून, महाराष्ट्र शासनाच्या सूचनांचे व पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे सरळ उल्लंघन करत होता. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली ​पोलिस करत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles