Friday, February 20, 2026

ऐन निवडणुकीत वाद उफाळणार; चित्रा वाघ यांचं प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य

नगर परिषदेची निवडणुकीत प्रचाराचा धडाका

चित्रा वाघ यांची मंगळवेढ्यात प्रचारसभा

चित्रा वाघ यांच्या वक्तव्याने नव्या वादाची शक्यता

राज्य आयोगाकडून २९ महापालिका निवडणुकींची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या टप्प्याच्या नगर परिषदेची निवडणूकही सुरू आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षातील नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावलाय. पंढरपूरच्या मंगळवेढ्यातही निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवेढा नगर परिषदेतील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांनी आज हजेरी दर्शवली. याच निवडणुकीतील प्रचारसभेतील चित्रा वाघ यांच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

पंढरपुरातील मंगळवेढा नगरपरिषदेची निवडणूक सुरू आहे. यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. भाजप आमदार चित्रा वाघ या देखील विविध ठिकाणी प्रचारासाठी फिरताना दिसत आहेत. चित्रा वाघ यांनी आज मंगळवेढ्याला भाजप उमेदवार सुप्रिया जगताप यांच्या निवडणूक प्रचाराला हजेरी लावली. या प्रचारार्थ महिला मेळाव्यात चित्रा वाघ यांनी उपस्थितांना संबोधित करताना वादग्रस्त वक्तव्य केलं.

मंगळवेढ्यातील प्रचारसभेतील चित्रा वाघ यांच्या वादग्रस्त वक्तव्याने ऐन निवडणुकीत नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. खा कुणाचंही मटण, पण कमळाचं दाबा बटण, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं. तसेच या मेळाव्यात आमदार चित्रा वाघ यांनी ‘जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा’ या गाण्यावरही ठेका धरला. यावेळी इतर महिला पदाधिकाऱ्यांनीही या गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळालं.

तत्पूर्वी, लोकप्रतिनिधी असलेल्या चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्याने विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. विरोधकांकडून कारवाईची मागणी होत आहे. विरोधकांच्या मागणीनंतर निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहावे लागेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles