विनापरवाना सभा घेणे भोवले; सागर मुर्तडकर विरोधात गुन्हा दाखल
अहिल्यानगर -शहरातील वंजार गल्ली भागात कोणताही अधिकृत परवाना न घेता सार्वजनिक रस्ता पूर्णपणे बंद करून सभेचे आयोजन केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात वर्चस्व ग्रुपचे अध्यक्ष सागर मुर्तडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर मुर्तडकर यांनी वंजार गल्ली ते रामचंद्र खुंट या मार्गावर वॉर्ड क्रमांक ५ आणि १० मधील नागरिकांची बैठक व स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. रस्ता अडवल्यामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत होऊन पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ही गर्दी पाहून विचारणा केली व रस्ता मोकळा करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन करून कार्यक्रम सुरूच ठेवल्याने पोलिसांनी ही कठोर भूमिका घेतली. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमान्वये हा गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
अहिल्यानगर शहरात विनापरवाना सभा घेणे भोवले; सागर मुर्तडकर विरोधात गुन्हा दाखल
- Advertisement -


