नवरा-नवरीच्या लग्नातील ‘तो’ क्षण पाहून सगळेच गेले भारावून; जोडप्याचा व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

लग्न हा नवरा-नवरीच्या आयुष्यातील अगदी खास क्षण असतो. या मंगल दिवशी नवरा आणि नवरीला सर्वांत सुंदर दिसायचे असते. लग्नात सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळून राहाव्यात, अशीही प्रत्येक जोडप्याची आपेक्षा असते. मग त्यासाठी काही जण अनोखी एंट्री, तर कोणी नवऱ्यासाठी खास डान्स, तर कधी मंगळसूत्र घालण्याआधी परवानगी मागणे अशा अनेकविध गोष्टींद्वारे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण, आज सोशल मीडियावर एका जोडप्याचा असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्ही नक्कीच भारावून जाल…

अभिनेता अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ चित्रपटातील ‘आज से तेरी’ या गाण्यातील ‘तेरे माथे के कुमकुम को मैं तिलक लगा के घुमूंगा’ ही ओळ तुम्ही ऐकली आहे का? हो… तर आज याच गाण्याच्या ओळीचे प्रात्यक्षिक एका लग्नात बघायला मिळाले आहे. जोडप्याच्या लग्नाचे विधी सुरू असतात. याचदरम्यान नवरा नवरीच्या भांगेत कुंकू भरत असतो. कुंकू भरल्यानंतर तो अगदी प्रेमाने भांगेतील कुंकू आपल्या बोटावर घेऊन स्वतःच्या कपाळावर लावताना दिसतो.एवढंच नाही, तर ही प्रेमळ कृती करताना नवरा त्या गाण्याची ओळसुद्धा गात असतो, ज्यामुळे नवरीला खूप आनंद झाल्याचे तिच्या चेहऱ्यावर दिसून येत असते. प्रेम कसे व्यक्त करायचे याबद्दल अनेकांना कल्पना नसते. काही जण गुलाब देणे, गुडघ्यावर बसून प्रपोज करणे यांसारख्या युक्त्यांचा वापर करतात. पण, खरे प्रेम करणारी मंडळी व्हायरल व्हिडीओप्रमाणे असे काहीतरी प्रेमळ क्षण जोडीदाराच्या आयुष्यात घेऊन येतात. नवरा-नवरीचा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा…


सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @bee. hey3 आणि @kukusharma_2003 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles