जामखेडला एकावर गोळीबार; गाडी व हॉटेलची तोडफोड, हल्लेखोर पसार

जामखेड शहरातील बीड रोडवरील हॉटेल कावेरी या ठिकाणी हॉटेलची तोडफोड करीत केलेल्या गोळीबारात हॉटेल मालक गंभीर जखमी झाला आहे. तसेच चारचाकी गाडीची देखील तोडफोड केली आहे. मागील भांडणाच्या कारणावरून गोळीबार करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी रात्री हॉटेल मालक रोहीत अनिल पवार (वय २७) हा हॉटेलवर गिऱ्हाईक पहात होता. यावेळी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळीने हॉटेलवर येत हल्ला करून तोडफोड केली. तसेच रोहीत पवार याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो या गंभीर जखमी झाला. यानंतर संशयितांनी हॉटेल मालकाच्या चारचाकी गाडीची तोडफोड केली.दरम्यान, या हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान झाले असून, संशयित हल्ला करुन पळून गेले. तर जखमीस तातडीने पुढील उपचारासाठी नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या जामखेड पोलिसांकडून सुरू आहे. याशिवाय पोलिसांकडून सध्या आजुबाजुचे काही सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत.

अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात एका व्यसनी तरुणाने दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता नकार दिल्याने महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपी जुनेद सादिक शेख (रा. कोठला, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जुनेद सादिक शेख यांनी पैसे मागितले, परंतु महिलेने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर वाद आरडाओरड्यात रूपांतरित झाला आणि संतापलेल्या
आरोपीने हातातील चाकूने महिलेवर प्राणघातक हल्ला केला. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या नातेवाईकांनाही आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. जखमी महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण करत आहे. भरवस्तीत झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, स्थानिकांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles