अहिल्यानगर जिल्ह्यात चंदनाची तस्करी ;चंदन तस्कर मुद्देमालासह पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर -चंदन तस्करला पोलिसांनी ३० किलो चंदनासह अटक केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. नाशिकहून श्रीरामपूरकडे चंदनाची तस्करी करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत ३० किलो चंदनासह एक कार आणि मोबाईल असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हनुमंता भिमा मोरे (रा. उंबरगाव, श्रीरामपूर) असे या चंदन तस्कर ‘पुष्पा’चे नाव आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अवैध चंदनाच्या विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक लोणी परिसरात गस्त घालत होते. यावेळी एका सफेद रंगाच्या कारमधून चंदनाची लाकडे नेली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. ​तळेगाव ते लोणी रस्त्यावर पथकाने अब्दुल कलाम सेंटरजवळ सापळा लावला. संशयित वाहन येताच पोलिसांनी त्याला थांबवले. कारची झडती घेतली असता त्यात ६० हजार रुपये किमतीचे ३० किलो चंदन आढळले. पोलिसांनी चालक हनुमंता भिमा मोरे (रा. उंबरगाव, श्रीरामपूर) याला ताब्यात घेतले आहे. त्याने ही लाकडे नाशिक जिल्ह्यातील एका इसमाकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली असून संबंधित पुरवठादार सध्या फरार आहे. ​या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. पुढील तपास लोणी पोलीस करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles