सोशल मीडियावर रोज अनेक लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी नवरा-नवरीचा रोमँटिक डान्स, तर कधी नवरीची भन्नाट एंट्री पाहायला मिळते. पण, काही व्हिडीओ असे असतात की ते पाहून हसू आवरणं कठीण होतं. सध्या असाच एक मजेशीर आणि निरागस व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
या व्हिडीओत नवरीसमोर गुडघ्यावर बसून प्रपोज करायला विसरलेला एक भोळा नवरदेव दिसतोय. विशेष म्हणजे त्याला गुडघ्यावर कसं बसायचं, हे थेट मंडपातच घरचे शिकवत असल्याचं दृश्य पाहायला मिळतंय. याच निरागसतेमुळे हा व्हिडीओ सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका लग्नसमारंभातील आहे. लग्नाच्या विधीदरम्यान नवरदेवाने नवरीसमोर गुडघ्यावर बसून तिचा हात पकडायचा असतो असा एक क्षण येतो. साधारणपणे हा क्षण रोमँटिक असतो, पण इथे सगळंच उलट घडलं. नवरदेव इतका गोंधळलेला आणि लाजाळू दिसतो की त्याला नेमकं काय करायचंय हेच कळेनासं होतं. हाच क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि पुढे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.व्हिडीओत नवरदेव पारंपरिक पोशाखात, डोक्यावर फेटा घालून स्टेजवर उभा असल्याचं दिसतं. समोर नवरी शांतपणे उभी आहे. नवरदेव गुडघ्यावर बसण्याचा प्रयत्न करतो, पण नीट बसताच येत नाही. तो कधी अर्धवट खाली वाकतो, कधी परत उभा राहतो. ते पाहून त्याचे घरचे आणि नातेवाईक स्टेजवरूनच त्याला इशाऱ्यांनी समजावताना दिसतात.
https://x.com/Shreya_Tonk/status/2000179279892730212?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2000179279892730212%7Ctwgr%5Efa091e961e2f5ca2b3b858cb745b38b6773fd661%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fgroom-forgets-to-propose-on-knee-family-trains-him-in-wedding-mandap-viral-video-sap-05-5584278%2F
कोणी त्याला हळू बस असं सांगतंय, तर कोणी हात धरून आधार देतोय; तर त्याला दोन जण कसं बसायचं ते बसून दाखवत आहेत. सगळा प्रकार इतका गोड आणि मजेशीर आहे की मंडपात उपस्थित लोकही हसू आवरू शकले नाही. नवरीसुद्धा लाजत-हसत हे सगळं पाहताना दिसते. या संपूर्ण प्रसंगातून नवरदेवाचा साधेपणा आणि भोळेपणा समोर येतो.
हा व्हिडीओ @Shreya_Tonk नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आलाआहे.


