आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण घरबसल्या पैसे कमवत आहेत. काही जण युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर अशा अनेक प्लॅटफॉर्मचा वापर त्यांचे टॅलेंट दाखवण्यासाठी करत आहेत आणि नावासोबत पैसेसुद्धा कमवताना दिसून येत आहेत. व्यापारी असो किंवा एखादा कलाकार, प्रत्येक जण आपल्या कौशल्याचा वापर करून नवनवीन व्हिडीओ पोस्ट करताना दिसून येतात; तर अशातच काही जण असेही असतात, जे परिस्थितीमुळे आपलं टॅलेंट लोकांपर्यंत पोहचवू शकत नाहीत किंवा सोशल मीडियाची मदत घेतात. ज्यामुळे लाखो कलाकारांच्या कलेला आता वाव मिळू लागला आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक नवरी तिच्या लग्नाच्या सोहळ्यात गाणं करताना दिसतेय.
लग्न असो किंवा साखरपुडा हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप सुंदर आणि आयुष्य बदलणारा क्षण असतो, त्यामुळे या दिवशी वधू आणि वर त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. सुंदर कपडे, दागिने, मेकअप यासह डान्स, फोटोशूट अशा अनेक गोष्टींची आधीपासून तयारी केली जाते. आजपर्यंत अनेक लग्नांमधील आणि साखपुड्यातील काही हटके व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या पाहिले असतील. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात नवरी तिच्या पतीसाठी गाणं गाताना दिसतेय.या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नात पतीबरोबर एन्ट्री घेतेवेळी वधू पतीसाठी सुंदर गाणं गाते. यावेळी ती “रब ने बना दी जोड़ी” या बॉलिवूड चित्रपटातील “होले होले हो जाएगा प्यार” या गाण्यावर सुरेल आवाजात गाणं गात आहे. तिच्या सुंदर आवाजाने आसपास बसलेले वऱ्हाडी देखील तिच्याकडे कौतुकाने पाहतात. सोशल मीडियावर या नववधूच्या गाण्यावर सुंदर प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @henna.umairaa या अकाउंटवर शेअर केला आहे.


