Monday, November 3, 2025

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठे बदल,१० ग्रॅमचा भाव

सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले होते. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत होती. अशातच आज पुन्हा शुक्रवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २५ एप्रिल २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २५ कॅरेट सोन्याचा दर ९६,०३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८८,०२८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९७,९६० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९८० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles