Saturday, November 1, 2025

सीमा हैदरचे प्रकरण पुन्हा चर्चेत……अवघ्या 48 तासात पाकिस्तान वापसी करावीच लागणार?

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने कठोर भूमिका घेत देशात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. तसेच, 48 तासांच्या आत देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयानंतर सीमा हैदरचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या संदर्भात सीमाच्या वकिलाने तातडीने महत्त्वाची माहिती दिली आहे. सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली आणि तिने भारतीय तरुण सचिन मीनाशी लग्न केले होते. ती उत्तर प्रदेशातील रघुपूर गावात तिच्या सासरच्यांसोबत राहत आहे आणि तिने अलीकडेच एका मुलीला जन्म दिला आहे. ती चार मुलांची आई आहे.

सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, सीमाचा खटला इतर पाकिस्तानी नागरिकांपेक्षा वेगळा आहे. सीमाची सर्व कागदपत्रे गृह मंत्रालय आणि एटीएसकडे जमा आहेत. तसेच त्यांची याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. त्यांनी सांगितले की सीमाला उत्तर प्रदेश कोर्टाकडून जामीन मिळाला आहे आणि ती सर्व कायदेशीर अटींचे पालन करत आहे. वकिलाने असाही दावा केला की सीमा आणि तिच्या कुटुंबाला पाकिस्तान समर्थित घटकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, ज्यांच्याबाबत वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या जात होत्या.

राष्ट्रपतींकडे याचिका प्रलंबित
एपी सिंह म्हणाले की, सीमा आश्रयाच्या आधारावर भारतात राहत आहे आणि तिला भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारवर पूर्ण विश्वास आहे. दरम्यान, या घटनेदरम्यान, सीमा हैदरचा पहिला पती गुलाम हैदरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो सीमाला पाकिस्तानात परत पाठवायला हवे असे म्हणत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी माझ्या मुलांसाठी आसुसलो आहे. भारत सरकारने माझ्या मुलांनाही पाकिस्तानात परत पाठवावे. जर तुम्ही सीमाला पाकिस्तानला पाठवू शकत नसाल तर तिला तिथे शिक्षा करा. तिला मदत करणारा, तिचा मानलेला भाऊ एपी सिंहला लाज वाटली पाहिजे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles