Tuesday, November 4, 2025

अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

अहिल्यानगरः जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात मध्यरात्रीच्या सुमारास एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रयत्नातून तो हाणून पाडण्यात आला. काल, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

किसन दादा शिंदे (वय ३८, रा. भेंडा, पाटबंधारे कार्यालयाजवळ, रस्तापूर रस्ता, नेवासा) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. भिंगार कँप पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल रात्री उशिरा शिंदे हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आला व त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने तेथे रात्र ड्यूटीवर असलेल्या पोलिसांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. याप्रकरणी शिंदे विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अनिल झरेकर यांनी फिर्याद दिली आहे. किसन शिंदे व त्याच्या नातेवाईकांमध्ये भूखंडासंबंधी वाद आहे. त्यांना याबाबत संबंधित सरकारी कार्यालयातून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी रविवारी रात्री पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. स्वतःच्या अंगावर पेट्रोलसदृश पदार्थ ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी त्याला तेथील ड्यूटीवर असलेल्या पोलिसांनी वेळीच रोखले, यामुळे पुढील अनर्थ टळला. भिंगार कॅम्प पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. शिंदे याला ताब्यात घेतले व गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार रवींद्र टकले करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles