Wednesday, November 5, 2025

१२वी पास महिलांसाठी सरकारी नोकरीची संधी; अंगणवाडीत भरती सुरु

१२वी पास महिलांसाठी सरकारी नोकरीची संधी; अंगणवाडीत भरती सुरु

महिला व बालविकास विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. अंगणवाडीत ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी महिला व बालविकास विभागाने अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. राज्य शासन श्रेणीअंतर्गत तुम्हाला नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. अंगणवाडीत पर्मनंट नोकरी करण्याची संधी असणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने फक्त १२वीपास असणे गरजेचे आहे.

अंगणवाडी मदतनीस पदासाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. यामध्ये १२वीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. विधवा महिला ४० वयोपर्यंत अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवाराने स्वतः ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. ३३ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.लातूर शहर महानगरपालिका हद्द परिसरात ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मे २०२५ आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी, लातूर शहर, त्रिमूर्ति भवन, पहिला मजला, उदय पेट्रोलपंप बाजूला, बार्शी रोड, लातूर येथे पाठवायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करणारी महिला लातूर महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असावी. अर्जासोबतच शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles