Wednesday, November 5, 2025

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित ,जिल्हा प्रशासनासह सर्वांना फायनल तारखेची प्रतीक्षा

चोंडी (ता. जामखेड) या ठिकाणी होणार्‍या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीची तयारी प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. येत्या 6 मे रोजी ही बैठक होणार असल्याचे प्रस्तावित असून बैठकीच्या नियोजनाची तयारीचा भाग म्हणून जिल्हा पातळीवरील विविध अधिकार्‍यांवर बैठकीच्या व्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ बैठक नियोजन समितीची जबाबदारी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोर, जिल्हा परिषद बांधकाम विभाग दक्षिणेचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी व गटविकास अधिकारी जामखेडचे राहुल शेळके यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यासह बैठकीसाठी आवश्यक असणार्‍या विविध बाबींच्या पूर्ततेसाठी वेगवेगळ्या निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत.

याची जबाबदारी बांधकाम विभागाची कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, जिल्हा परिषदेची मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, व उपमुख्य कार्यकारी अधिकारी लेखा राजू लाकुडझोडे, समन्वय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अरूण उंडे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन अतुल चोरमारे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, उपचिटणीस गृह शाखा मयूर बेरड, सहाय्यक महसूल अधिकारी स्वप्निल फलटणे, संदेश दिवटे निलेश सोनसळे.
कार्यक्रमस्थळ समिती प्रमुखपदी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरत कुमार बाविस्कर, महावितरण विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार, रोजगार हमी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप सोनकुसळे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब नन्नवरे, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण, सुप्रिया कांबळे, जामखेड नगर परिषदेची सुरेश साळवे, ऊर्जा व कामगार विभागाच्या विद्युत निरीक्षक राजश्री गीते, स्वागत समितीच्या प्रमुखपदी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी संगमनेर शैलेश शिंदे, तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार मुदगल, वाहन तर समितीच्या प्रमुख अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, बांधकाम विभाग उपअभियंता शशिकांत सुतार, वाहतूक विभागाची निरीक्षक बाबासाहेब बोरसे, मोटर वाहन निरीक्षक सावंत पाटील, कर्जत नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय जायभाय यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.यासह विश्रामगृह व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था व वाहतूक नियोजन, भोजन व्यवस्था, खाद्य पदार्थ तपासणी समिती, वाहन चालक अधिकारी समन्वय समिती, मीडिया समिती, रांगोळी व सजावट, वैद्यकीय सेवा समिती, अग्निशामन व पिण्याचे पाणी स्वच्छता समिती, सुरक्षा पासेस, विद्युत व्यवस्था, तांत्रिक कक्ष, आपत्ती व्यवस्थापन समिती, नोडल अधिकारी या ठिकाणी विविध अधिकार्‍यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान मंत्रीमंडळाची बैठक आधी 29 एप्रिला होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे ही बैठक 6 मे रोजी असल्याचे सांगण्यात आले. बैठकीबाबत अद्याप निश्चित तारीख जाहीर झालेली नसली तरी जिल्हा प्रशासानाच्यावतीने बैठकीचे नियोजन सुरू आहे. वेगवेगळ्या पातळीवर समितीनिहाय अधिकारी नियोजनात व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles