राष्ट्संत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्कार जिल्हा हमाल पंचायत चे अध्यक्ष अविनाश घुले यांना जाहीर
नगर- नेवासा तालुक्यातील गोंडेगाव जनकल्याण फाऊंडेशन च्या सन २०२५ चे राष्ट्संत तुकडोजी महाराज आदर्श समाजभूषण पुरस्कारसाठी अहिल्यानगर जिल्हा हमाल पंचायत चे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती फाउंडेशन चे अध्यक्ष पांडुरंग रोडगे यांनी दिली .पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दि ३०-०४-२०२५ रोजी साय ६ वाजता आमदार विठ्ठलराव लंघे यांच्याहस्ते गोंडेगावं येथे होणार असल्याचे सचिव सुरेश रोडगे व रामदास नजन यांनी सांगितले
 यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव सुद्धा करण्यात येणार आहे
 अविनाश घुले यांचे जिल्हा हमाल पंचायत च्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर काम सुरु असून डॉ बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनानुसार राज्याच्या कार्यकारणीवर सुद्धा ते काम पाहतात तसेच अहिल्यानगर येथे सर्व कामगार संघटनांचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांचे काम सुरु आहे . रिक्षा पंचायत ,वेगवेगळ्या कामगार संघटना आदी च्या माध्यमातून त्यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध आंदोलने केली आहेत या त्यांच्या कामाची दखल घेऊनच त्यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे .पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .


