Monday, November 3, 2025

जिल्ह्यातील सहा अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह,पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

अहिल्यानगर-पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या राज्यातील 800 पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन महाराष्ट्र दिनी गौरविण्यात येणार आहे. यात अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणार्‍या सहा पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांनी सोमवारी (28 एप्रिल) ही यादी जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणारे गणेश रामदास चव्हाण, दिगंबर रावसाहेब कारखेले, मल्लिकार्जुन कैलास बनकर, खलील अहमद दाऊद शेख, कृष्णा नाना कुर्‍हे आणि प्रमोद मोहनराव सांगळे या सहा जणांना उल्लेखनीय कामगिरी बद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे. महाराष्ट्र दिनी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार्‍या समारंभात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याहस्ते हे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

गणेश चव्हाण हे अहिल्यानगर शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात नेमणुकीस आहेत. दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर हे येथील सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांनी सायबर गुन्ह्यांच्या तपासात मोलाची कामगिरी केली आहे. पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्राप्त करणे हा एक मोठा मान आहे. पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांची मेहनत, निष्ठा आणि कर्तव्यपरायणतेला हा सन्मान मिळाल्यामुळे ते पुढील कार्यासाठी प्रेरित होतील. पोलीस अंमलदारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles