गेल्या अनेक वर्षांपासून जातिनिहाय जनगणना करण्याच्या मागणीला जोर धरला होता. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जातीनिहाय जनगणना करण्यास मंजुरी दिली आहे. आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील घोषणा केली. दरम्यान, ही घोषणा होताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
“देशात सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं जातनिहाय जनगणनेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार! केंद्र सरकारचा जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून यामुळं सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यास मदत करेल”, असं अजित पवार म्हणाले.


