Saturday, November 1, 2025

मा.आ.अरुणकाका जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

माजी आमदार अरुणकाका जगताप यांना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, :- “माजी आमदार श्री. अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांचे निधन ही अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी आणि असून त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मिळो, अशी प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत अरुणकाकांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना.,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार श्री. अरुणकाका जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे

अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषद चे माजी आमदार अरुणकाका बलभीम जगताप यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद व नगरकरांच्या मनाला चटका लावणारी आहे. अहिल्यानगरच्या राजकारणात, समाजसेवेत त्यांचे अमूल्य असे योगदान आहे. काकांचे आज दि. 2 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ते 67 वर्षांचे होते. अरुणकाकांच्या निधनाच्या वृत्ताने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.अरुणकाका जगताप यांचं पार्थिव राहत्या घरी सारसनगर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मागील काही दिवसांपासून पुणे येथे खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू होते. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.अहमदनगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते. तसेच गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते. अरुणकाका जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोनवेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून गेले होते. काकांच्या निधनाच्या वृत्ताने नगरकरांवर शोककळा पसरली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles