Sunday, November 2, 2025

गुड न्यूज! मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर , यावर्षी मान्सून लवकरच दाखल होणार

यावर्षी मान्सून लवकरच दाखल होणार आहे. मान्सून १३ मेपर्यंत अंदमनात- निकोबार दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा ८ ते १० दिवस आधीच आगमन होणार असल्याची माहिती पुण्याच्या हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ही आनंदवार्ता आहे.

महत्वाचे म्हणजे, अंदमान- निकोबार बेटांवर मान्सूनच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. हवेचे दाब कमी झाल्याने मान्सूच्या हालचालींना वेग आल्याचे सांगण्यात आले आहे. सलग ५० दिवस चाललेल्या उष्णतेचा परिणाम झाल्याने मान्सून यावर्षी १० दिवस आधी अंदमान-निकोबारमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

यावर्षी देशामध्ये १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा एल निनोचा प्रभाव नसल्याने आणि ला निना सारख्या अनुकूल वातावरणामुळे पावसाचे प्रमाण चांगले राहील, असे हवामान खात्याने सांगितले. यंदा मान्सून १३ मेपर्यंत अंदमनात- निकोबार दाखल होणार असल्यामुळे यावर्षी १० दिवस आधीच मान्सून सगळीकडे दाखल होणार आहे.

यावर्षी पन्नास दिवस देशभरामध्ये उष्णतेची लाट सक्रिय होती. त्यामुळे हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील पाणी प्रचंड तापले होते. बाष्पीभवनाचा वेग वाढल्यामुळे संपूर्ण देशाभोवती बाष्पयुक्त ढग तयार झाले आहेत. याच कारणामुळे मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले आहे.

मान्सून दरवर्षी अंदामान-निकोबार बेटावर १८ ते २२ मेच्या सुमारास येतो. पण यावर्षी तो १० दिवस आधीच दाखल होणार आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण देखील अंदामान-निकोबार बेटावर तयार होण्यास सुरूवात झाली आहे. मान्सून अंदमानमध्ये दाखल झाल्यानंतर पुढच्ये ५ ते ६ दिवसांत तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles